breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

#CoronaVirus: टाटा ट्रस्टकडून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 500 कोटींची मदत

कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी सामजिक संस्था, खासगी कंपन्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीमत्वांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.  टाटा ट्रस्टनेही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तब्बल ५०० कोटींची मदतीची घोषणा केली आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

रतन टाटा यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, करोनाचं संकट हे मानवासमोरील कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाने यापूर्वी कठिण प्रसंगात देशासाठी आवश्यक योगदान दिले आहे. आतापर्यंतचा हा देशासमोरील सर्वात मोठा प्रसंग असून या संकटात टाटा ट्रस्टकडून ५०० कोटींची मदत करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button