नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी ॲक्सिस बँकेला २५ लाखांचा दंड
![Axis Bank fined Rs 25 lakh for violating rules](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Axis-Bank.jpg)
मुंबई – २०१६च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ॲक्सिस बँकेला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे, असे आरबीआयने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने केवायसीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे ॲक्सिस बँकेने उल्लंघन केले असल्याचे तपासणीत आढळले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने १ सप्टेंबरला ॲक्सिस बँकेला २५ लाखांचा दंड ठोठावला. आरबीआयने ॲक्सिस बँकेच्या केलेल्या तपासणीत फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२० या कालावधीत बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला. आरबीआयने यापूर्वीही अनेक बँकांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावले आहेत. मात्र खासगी क्षेत्रातील मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲक्सिस बँकेला दंड झाल्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे.