breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सोन्याचा भाव 50,010 रुपयांवर गेला.

मागील दोन दिवसांत सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत १ टक्का वाढ झाली. सोन्याचा भाव ५००१० रुपयांवर गेला. चांदीच्या भावात ४ टक्के वाढ झाली असून चांदीचा दर एक किलोला ५९६३५ रुपये झाला आहे. मंगळवारी सोने ५०० रुपयांनी महागले होते. तर चांदीमध्ये तब्बल ३४०० रुपयांची वाढ झाली होती.

कोरोनामुळे झालेल आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी काही केंद्रीय बँकांकडून नव्याने पॅकेज घोषीत केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात तेजी निर्माण झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले.

सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये झपाट्याने भाववाढ झाली आहे. करोना संकट वाढत असले तरी अनेक देशांनी आता लॉकडाऊनच्या नियमाला शिथिल केलं आहे. औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे चांदीची मागणी वाढली असल्याचं म्हटलं जात आहे. नजीकच्या काळात चांदीचा भाव ५५००० ते ५७९०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


goodreturns.in या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८११० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४९११० रुपये झाला आहे. चांदीचा भाव किलोला ६०४०० रुपये झाला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत ५०० रुपयांची वाढ झाली.दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७९१० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९११० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८४९० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९८९० रुपये आहे.आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१०० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३८० रुपये झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button