लॉकडाऊनदरम्यान स्वयंपाकाच्या गॅसच्या मागणीत 20 टक्क्यांची वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-129.png)
लॉकडाऊनदरम्यान एप्रिल महिन्याच्या पहिल्या २० दिवसांत स्वयंपाकाच्या गॅसच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची १ एप्रिल २० एप्रिलदरम्यानची विक्री ही ६.९७ लाख टनावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत १९.६ टक्के जास्त आहे. या दरम्यान उज्ज्वला योजनेच्या १.१ कोटी लाभार्थींना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे.
इंडियन ऑईलने म्हटले आहे की, ही मागणी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांसाठी स्वयंपाकाच्या गॅसची आपली आयात ५० टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर एलपीजी बॉटलिंगचे काम अविरत सुरु आहे. रविवार आणि सुटीच्या दिवसातही कर्मचारी काम करत आहेत.
इंडियन ऑईलने एका निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन उघडल्यानंतर अचानक पेट्रोलियम उत्पादने म्हणजेच पेट्रोल, डिझेल, पेट्रो रसायन, विमान इंधन आदींची मागणी वाढण्याची शक्यता आहे. हे पाहता याचे आधीच पुरेसा साठा करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीत १४.२ किलोचा बिगर सबसिडीचा स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत १ एप्रिलपासून ६१.५० रुपयांनी कमी करुन ७४४ रुपये करण्यात आला आहे. मार्चमध्ये याची किंमत ८०५.५० रुपये होती.