breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

लॉकडाऊनचा गोव्यातील काजू बागायतदारांना फार मोठा फटका

लॉकडाऊनचा गोव्यातील काजू  बागायतदारांनाही फार मोठा फटका बसला आहे. काजू उत्पादक तसेच विरोधी कॉंग्रेस पक्षाने बागायतदारांना काजूसाठी पुरेसा आधारभूत दर द्यावा, अशी आग्रही मागणी सरकारकडे केली आहे.

गोव्यातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅंड, ऑस्ट्रेलिया व मध्यपूर्व राष्ट्रांना गोव्याचा काजू जातो. गोव्याला भेट देणारे पर्यटक काजू घेतल्याशिवाय जात नाहीत. त्यामुळे जशी मद्याची दुकाने गोव्याच्या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये जागोजागी दिसतात तशीच काजू विक्री करणारी दुकाने हजारोंच्या संख्येने आहेत. काही दुकानदार तर काजू अन्य राष्ट्रांमधून आयात करूनही विकतात. अशी एक आकडेवारी मिळते की, इंडोनेशिया, तांझानिया व पूर्व आणि पश्चिम आफ्रिकन राष्ट्रांमधून १० ते १२ हजार टन काजू वर्षाकाठी गोव्यात आयात होतो. काजू विक्रीच्या दुकानांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल राज्यात होत असते. 

DYWPKB Cashew nuts growing on a tree This extraordinary nut grows outside the fruit

काजू बागायतदारांना सरकारने काजूसाठी किमान १३० रुपये प्रति किलो आधारभूत दर द्यावा, अशी मागणी गाकुवेध महासंघाचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गोवा बागायतदारने  प्रति किलो केवळ १०५ रुपये दर देऊ केला आहे. महासंघाला हा दर मान्य नाही. लॉकडाऊनच्या आधी १३५ रुपये किलो दराने काजू विकला गेला. मात्र आता हा दर घसरला असल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून काजू उत्पादकांना १३० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दर प्रतिकिलोला मिळेल याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button