breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

मुबाडालाची रिलायन्स रिटेलमध्ये ६ हजार २४७.५ कोटींची गुंतवणूक

मुंबई – अबुधाबी सरकारी फंड मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलमध्ये ६,२४७.५ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिटेलमधील त्यांची ही गुंतवणूक म्हणजे १.४ टक्के हिस्सेदारी आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये रिलायन्स रिटेलमध्ये झालेली ही ५ वी मोठी गुंतवणूक आहे. यापूर्वी मुबाडालाने रिलायन्सच्या जिओमध्ये गुंतवणूक केली होती.

रिलायन्स रिटेलमध्ये आतापर्यंत सिल्वर लेक, जनरल अटलांटिक, केकेआर अशा ५ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहिती रिलायन्स रिटेलमध्ये ही गुंतवणूक झाल्याचे म्हटले आहे. ३० सप्टेंबरला सिल्वर लेकणे रिलायन्स रिटेलमध्ये १,८७५ कोटींची आणखी गुंतवणूक केली होती. यापूर्वीही सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे रिलायन्स रिटेलमधील त्यांची एकूण गुंतवणूक ९ हजार ३७५ कोटी झाली आहे. त्यामुळे त्यांची हिस्सेदारी २.१३ टक्के झाली आहे. ३० सप्टेंबरलाच जनरल अटलांटिकनेही रिलायन्स रिटेलमध्ये ३,६७५ कोटींची गुंतवणूक केली आहे. सिल्वर लेकचे व्यवस्थापकीय पार्टनर इगॉन डर्बन यांनी या गुंतवणुकीबाबक घेषणा केली आहे. विशेष म्हणजे रिलायन्स’च्या जिओ नंतर रिलायन्स रिटेलमध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button