breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दरात 0.66 टक्क्यांनी घट

अमेरिका आणि चीनमधील तणाव तसेच अमेरिकेतील आंदोलने यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम झालेला पहायला मिळतोय. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा दरात ०.६६ टक्क्यांची घट झाली. सोने १० ग्रॅमला ४६३९० रुपये झाले आहे. तर,चांदीचा भाव ०.६९ टक्क्यांनी कमी झाला असून प्रती किलो ४८४७४ रुपये झाला आहे.

देशात अनलॉक-1.0 मधून बाजारपेठ पूर्वपदावर येत आहेत. लॉकडाउन शिथिल करण्यात आले असून जनजीवन सामान्य होऊ लागले आहे. करोना रोखण्यासाठी देशात पाचवा लॉकडाउन सुरु आहे. मात्र अनलॉक-1.0 च्या माध्यमातून लॉकडाउन टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येणार आहे. 

येत्या काही सत्रात सोन्याचा भाव ४५९०० ते ४६९०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज एसएमसी सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. चांदीचा भाव ४८००० आसपास राहणार असून तो ४९३०० पर्यंत जाऊ शकतो, असे या अहवालात म्हटलं आहे. 

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणाऱ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी ९,१९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button