Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी
भारतीय रिझर्व्ह बँकने 2019-20 मध्ये 2000 रुपयांच्या नव्या नोटांची छपाईच केलेली नाही.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/AAIVjij.jpg)
भारतीय रिझर्व्ह बँकने 2019-20 मध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केलेली नाही. यादरम्यान दोन हजारांच्या नोटांचा चलनातील वापर कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या 2019-20 च्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०१८ च्या अखेरीस चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांची संख्या ही ३३,६३२ लाख होती, मात्र मार्च, २०१९ च्या अखेरपर्यंत त्यात घट होऊन ३२,९१० लाखांवर गेली. आणि मार्च,२०२० च्या अखेरीस तर चलनात असलेल्या या नोटांची संख्या आणखी कमी होत २७,३९८ लाखांवर गेली.
चलनातील एकूण नोटांमध्ये मार्च २०२० च्या अखेरपर्यंत २००० रुपयांच्या नोटांचा वाटा २.४ टक्के राहिला. मार्च २०१९ च्या अखेरीस हा वाटा ३ टक्के तर मार्च २०१८ च्या अखेरपर्यंत हा वाटा ३.३ टक्के इतका होता, असेही आरबीआयच्या या वार्षिक अहवालात म्हटले आहे.