भारतातील लाखो लोकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती डार्क नेटवर विकली जात आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-59.png)
भारतातील लाखो लोकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड धोक्यात आहेत. सुमारे साडेचार लाख क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती डार्क नेटवर (स्पाय वेबसाइट) विकली जात आहे. हा खुलासा सायबर सिक्युरिटी फर्म ग्रूप-आयबीने केला आहे. ही सिंगापूरची एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/singapore-preivew-gib-fb-2-1024x538.png)
आयबीने ४,६०००० हून अधिक क्रेडिट आणि डेबिट कार्डसह एक अशा डेटाबेसची माहिती मिळवली आहे, जी ५ फेब्रुवारीला डार्कबेव जोकर्स स्टाशवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी ९८ टक्केपेक्षा जास्त कार्ड भारतातील नावाजलेल्या बँकांचे आहेत. विकण्यात येत असलेल्या माहितीत कार्ड नंबरसह सीव्हीव्ही कोडचाही समावेश आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/hacker-data-leakage.jpg)
भारतीय कार्डधारकांच्या नोंदींचा अपलोड केलेला आतापर्यंतचा दुसरा सर्वांत मोठा रेकॉर्ड आहे. कार्डची माहिती अपलोड केल्याचे प्रकरण मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये समोर आले होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/dfdsfd_5e3e9a8a7337b.jpg)
डार्कनेटवर विकण्यात येत असलेल्या माहितीची किंमत ही सुमारे ४.२ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ३० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ही महत्त्वाची माहिती स्पाय वेबसाइटकडे कशी पोहोचली हे अद्याप समजू शकलेले नाही.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/056d53be45e576766900a7bcebed532d5d914558.jpg)
ग्रूप आयबीने म्हटले की, त्यांनी डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती विकल्या गेल्याबाबत इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (सीईआरटी-इन) सांगण्यात आले आहे. डार्क नेट अशा स्पाय वेबसाइट्स असतात की, ज्यांच्या आड मादक पदार्थांची तस्करी आणि इतर बेकायदा कामे केले जातात.