breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

टाटा टेक्नोलॉजीने कंपनीने मोठ्या संख्येत कर्मचाऱ्यांना कामाशिवाय घरी बसवले

कोरोनामुळे सर्वच नोकऱ्यांना उतरती कळा लागली आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. याला अपवाद फक्त टाटा उद्योग समूहाचा आहे. कोरोना व्हायरसच्या आर्थिक संकटामुळे टाटा टेक्नोलॉजीने कंपनीतील मोठ्या कर्मचाऱ्यांना कामाशिवाय बसवले आहे. पण एकाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले नाही.

टाटा टेक्नोलॉजीनेकंपनीतील ४०० कर्मचाऱ्यांना पेड लीव्ह दिली आहे. तर काहींना विना पगार सुट्टीवर पाठवले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती बदलली आहे. आम्ही टाटा टेक्नोलॉजीला उत्साही, तातडीने काम करू शकेल आणि लवचिक कंपनी करायचे आहे. यासाठी हा निर्णय घेतला असून काही कर्मचाऱ्यांना कामा शिवाय बसवण्यात आले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार नाही. तसेच त्यांच्या कुटुंबासह या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी आरोग्य विमाचे सरंक्षण देणार आहे. दरम्यान, नॅशनल इनफर्मेशन टेक्नॉलॉजी एप्लॉइ सीनेटने कर्मचाऱ्यांच्या वतीने पुण्यातील कामगार आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. संबंधित तक्रारीत कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी असे म्हटले आहे.

NITESचे जनरल सेक्रेटरी हरप्रीत सलूजा म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कर्मचाऱ्यांना २२ जुलैपर्यंत एका इ-मेलला उत्तर देण्यास सांगितले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना पेड लीव्ह तर काहींना अनपेड लीव्हवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कोणाची नोकरी जाणार नाही. त्याच बरोबर आम्ही आरोग्य विम्याचा फायदा मिळेल.भविष्यात कंपनी या कर्मचाऱ्यांना काढून टाकणार का यावर आताच कंपनीकडून काही सांगितले गेले नाही. जर मागणी असेल तर कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलवले जाणार आहे.

न्यूज वेबसाइट YourStoryशी विविध कंपन्यांद्वारे लाखो लोकांना काढून टाकण्याच्या घटनांवर बोलताना रतन टाटा म्हणाले, असे वाटत आहे की कंपन्यांच्या टॉप लीडरशिपकडील संवेदना कमी झाली आहे. ज्या लोकांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यांनी स्वत:चे करिअर कंपनीसाठी दिले. त्यांना अशा संकट काळी पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही त्यांना बेरोजगार करत आहात. उद्योग क्षेत्रातील टॉप लीडर्सना टाटांनी हा प्रश्न विचारला की, या काळात तुमचे कर्तव्य काय? तुमच्यासाठी नैतिकतेची व्याख्या काय? जे तुम्ही स्वत:च्या कर्मचाऱ्यांशी अशा पद्धतीने वागत आहेत. करोना आर्थिक संकट आल्यानंतर सर्व कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. पण टाटा ग्रुप याला अपवाद ठरला. टाटा ग्रुपने फक्त वरिष्ठ व्यवस्थापनातील लोकांच्या पगारात २० टक्के कपात केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button