breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

कोरोनाकाळातही जीएसटी संकलन गेल्यावर्षीपेक्षा दहा पटीने जास्त

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारचं आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमोडलं होतं. केंद्राच्या तिजोरीत खडखडाट झाला होता. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने जीएसटीतून मिळणारा महसूल १ लाख ०५ हजार १५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अर्थ मंत्रालयानं रविवारी ही माहिती दिली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा यंदा जीएसटीतून मिळालेला महसूल दहा टक्के जास्त आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितलं की, “ऑक्टोबर २०२० मध्ये एकूण जीएसटीचा महसूल १,०५,१५५ कोटी रुपये राहिला. यामध्ये केंद्रीय जीएसटी १९,१९३ कोटी रुपये तर राज्यांचा जीएसटी २५,४११ कोटी रुपये आहे. तसेच एकत्रित जीएसटी ५२,५४० कोटी रुपये आहे. (आयातीतून मिळालेल्या २३,३७५ कोटी रुपयांसह) तसेच उपकर हा ८,०११ कोटी रुपये आहे. (आयातीसह एकत्रित ९३२ कोटी रुपयांसह)”

ऑक्टोबर २०२० मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये जीएसटी संकलन ९५,३७९ कोटी रुपये राहिला. अर्थ मंत्रालयानं सांगितलं की, “३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण जीएसटी आर-३ बी रिटर्नची संख्या देखील ८० लाखांवर पोहोचली आहे.”

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे जीएसटी संकलनाचा आकडा सातत्याने अनेक महिन्यांपर्यंत एक लाख कोटी रुपयांच्या खाली राहिला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button