breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

एक रुपयाच्या नव्या नोटे बद्दल तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?

नवी दिल्ली | केंद्र सरकार लवकरच एक रुपयाच्या नव्या चलनी नोटा बाजारात आणणार आहे. या चलनी नोटा केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून आणण्यात येणार आहेत. एक रुपया व्यतिरिक्त इतर सर्व किमतीच्या चलनी नोटांची छपाई करणे आणि त्या वितरित करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची असते.

केवळ एक रुपयाची चलनी नोट केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते आणि वितरित केली जाते.

१. या नोटेवर इंग्रजीतील गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अक्षरांच्या वर भारत सरकार असे लिहिलेले असेल.

२. एक रुपयाच्या नव्या नोटेवर केंद्रीय अर्थ सचिव अंतनू चक्रवर्ती यांची हिंदी आणि इंग्रजीतील स्वाक्षरी असेल.

३. नवी नोट आयताकृती असून, त्याचा आकार ९.७ X ६.३ सेंटिमीटर इतका असेल.

४. नोटेच्या उजव्या बाजूला खालच्या भागात काळ्या रंगामध्ये क्रमांक छापलेले असतील.

५. नोटेच्या क्रमांकाचे पहिले तीन आकडे किंवा शब्द यांचा आकार एकसारखाच असेल

६. नव्या नोटेच्या मागच्या बाजूला भारत सरकार असे लिहिलेले असेल.

७. नव्या एक रुपयाच्या नाण्याचेच डिझाईन नव्या नोटेवर असेल. त्यावर सत्यमेव जयते असे लिहिलेले असेल आणि इंग्रजीतील L अक्षरानंतर क्रमांक असतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button