Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुलडाणा : जळगाव जामोद येथे मनसे कार्यकर्त्यांनी वाजवली हनुमान चालीसा

बुलडाणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी ५ वाजता मनसे उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार व जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती येथे शहराध्यक्ष नागेश भटकर यांच्या नेतृत्वात हनुमान चालीसा व महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष राजू राऊत, शहर उपाध्यक्ष संजय कोथळकर, शहर संघटक वैभव येनकर, शाखा अध्यक्ष योगेश म्हसाळ, अमोल ताडे, अमित इंगळे, सर्व पदाधिकारी तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खामगाव शहरातील चांदमारी भागातील हनुमान मंदिरावर लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालीसा दररोज सकाळी ६ नंतर आरतीच्या वेळेस वाजवण्यात येते. मात्र, आज शहर पोलीसांनी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान चांदमारी येथील मंदिरात जाऊन साऊंड सिस्टीम ताब्यात घेतली विशेष बाब म्हणजे त्या वेळेस साऊंड सिस्टीम बंद होती.

मनसे शहराध्यक्ष आनंद गायगोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांनी मंदिरामध्ये जाऊन मशीन उचलून नेली असल्याची माहिती दिली. पोलिसांच्या या कृत्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. शहरातील अनेक मशिदींमध्ये ज्या वेळेस कायद्यांचे उल्लंघन करत सकाळी ६ वाजायच्या आधीच अजान देण्यात आली त्या वेळेस पोलीसांनी भोंगे जप्त करण्याची धमक का दाखवली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील अनेक भागात तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button