breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बीएसएफची सांबा सेक्टरमध्ये कारवाई; ३ घुसखोर ठार, १८० कोटींचे ड्रग्ज जप्त

 

श्रीनगर | टीम ऑनलाइन
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये शनिवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ केलेल्या कारवाईत ३ घुसखोर ठार झाले. त्यांच्याकडून १८० कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सांबा सेक्टमधील भारत-पाक दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषावरून ३ पाकिस्तानी घुसखोरांनी शनिवारी रात्री भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने तात्काळ कारवाई केली. त्यात हे तिन्ही घुसखोर ठार झाले. त्यांच्याकडून ३६ किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत सुमारे १८० कोटी आहे. हे घुसखोर अंमली पदार्थांचे पाकिस्तानी तस्कर असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button