breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘ए भाई जगताप, लक्षात ठेव, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय’; अमृता फडणवीसांनी सुनावले

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केल्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. फडणवीस यांच्यावर सातत्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. आता अ‍ॅक्सिस बँकेचा मुद्दा पुन्हा उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते भाई जगताप यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,04,327 वर

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत वळवली, असा आरोप भाई जगताप यांनी केला होता. या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीसांनी एकेरी उल्लेख करत सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय, अशा शब्दात सुनावले आहे.

ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक’ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय, असा एकेरी उल्लेख करत अमृता फडणवीसांनी भाई जगताप यांना उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं, असे भाई जगताप म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button