‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीनं तिरंगा पदयात्रेचं आयोजन
नागपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील शाळांमधून मोफत तिरंगा वितरण केले जात आहे. तसेच ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रेचे आयोजनही करण्यात आले. या अभियानाअंतर्गत नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीनं तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आले. या तिरंगा पदयात्रेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते.
स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.