‘Statue of Unity’ inauguration : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Dqz9vfPXgAAsHKn.jpg)
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. सरदार पटेल यांंचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी बांधण्यात आलेल्या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल. भाजपाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून मागील काही महिन्यांपासून हा पुतळा चांगलाच चर्चेत आहे. या पुतळ्याचे एक मराठी कनेक्शनही आहे. शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान फार मोठे आहे. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुषही म्हटलं जातं आज लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण याच मुद्द्यांवर केंद्रीत असेल ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.