Rafale Deal: राहुल गांधींना भाजपाची शिकवणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/sitaraman-rahul-gandhi.jpg)
राफेल करारावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांना पक्षातील नेत्यांकडून योग्य माहिती दिली जात नाही आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्यासाठी मी एक शिक्षक नेमण्यास तयार आहे, असा चिमटा त्यांनी काढला आहे.
राफेल करारावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी सीएनएन- न्यूज १० या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. राफेल करारासंदर्भात त्या म्हणाल्या, यूपीए सरकारच्या काळात राफेल करार का मार्गी लागला नाही, याचे उत्तर आधी राहुल गांधींनी दिले पाहिजे. विद्यमान सरकार राफेल करारावर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. पण विरोधक सरकारचं ऐकून घेत नाही. तुम्ही चर्चेला सुरुवात करता आणि या चर्चेत उत्तर देण्यासाठी ज्यावेळी मंत्री उभे राहतात त्यावेळी तुम्ही पंतप्रधानांना बोलावण्यासाठी गदारोळ सुरु करता, असे त्यांनी काँग्रेसला सुनावले.