breaking-newsमराठवाडा

पार्सलवरील पाकिस्ताननगर पत्त्याने खळबळ; नांदेड पोलिसांनी सांगितले सत्य

नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील शेख खलील ( २५ वर्षीय ) या तरुणाने आपल्या लहान पुतण्यासाठी ऑनलाइन ( parcel address controversy ) कपडे मागवले होते. या कपड्याची डिलिव्हरी कोलकत्ता येथून होणार होती. यानुसार कपड्याचे पार्सल खलील याला मिळाले. पण त्या पार्सलवरील पत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आणि हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत ( nanded police ) पोहचला.

  • नांदेड शहरातील पाकिस्ताननगरच्या व्हायरल पोस्टचे सत्य

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कपडे कुरिअरने मागवणाऱ्या शेख खलील या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्याची चौकशी केली. त्यांनंतर हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खलील या तरुणाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याने मोबाइलमधून व्हाइस रेकॉर्ड करून संबंधित कंपनीला त्याचा पत्ता त्या अॅपवर पाठवला होता. कंपनीने खलील याच्या नावाखाली पाकिजानगर लिहिण्याऐवजी पाकिस्ताननगर, नांदेड असा पत्ता लिहिला. आणि हे कंपनीने गैरसमजातून टाकल्याचे स्पष्ट झाले.

नांदेड शहरात किंवा जिल्ह्यात पाकिस्ताननगर नावाचे कुठलेही नगर नाही. नांदेड शहरात देगलूर नाका भागात पाकिजानगर आहे. हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी सांगितलं. सोशल मीडियावर अशा कुठल्याही अफवा किंवा जाती-धर्मात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट टाकू नये. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक धबडगे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button