#CoronoVirus:Amazon आणि Flipkartवर आजपासून स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीला सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200504_095430.jpg)
नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. देशातील प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यांना ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. सरकारने यावेळी देशांतील काही भागांत लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आजपासून ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये स्मार्टफोन, फ्रिज आणि स्मार्ट टीव्ही यांची विक्री सुरु झाली आहे. याशिवाय या दोन्ही झोनमध्ये किरकोळ दुकानं देखील चालू होणार आहेत. सरकारच्या नियमावलीनुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलीवरीला देखील सरुवात होणार आहे. या दोन्ही झोमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत विक्री सुरु राहणार आहे.