#CoronaVirus: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 78.59 लाखांवर
![The state recorded 3,314 new corona patients in the last 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive.jpg)
मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 78 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर या महामारीमुळं मृतकांची संख्या आता चार लाख 27 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 2 लाख 76 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 78 लाख 59 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 32 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 40 लाख 36 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 60 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 321,626 रुग्ण आहेत. तर 9,199 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 150,101 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 162,326 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,142,224 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 117,527 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 850,796 कोरोनाबाधित आहेत तर 42,791 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 41,662 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 294,375 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,301 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 236,651 हजार इतका आहे.