#CoronaVirus:दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन प्रकृती नाजूक
नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयाने दिली आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा कोरोना अहवाल बुधवारी (17 जून) पॉझिटिव्ह आला. त्यानंतर दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल त्यांच्या प्रकृतीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असली तरी त्यांचा ताप कमी झालेला नाही. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.
तर रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 18 जूनला त्यांचा ताप कमी झाला. मात्र त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे बोलल जात आहे.