breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 65.62 लाखांवर

मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 65.62 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास एक लाख 21 हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4927 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 65 लाख 62 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 86 हजार वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 31 लाख रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 13 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 49 लाखांच्या घरात आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सातव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 216,919 रुग्ण आहेत. तर 6,088 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 106,724 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 104,107 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button