Breaking-newsआंतरराष्ट्रीय

#CoronaVirus:जगभरात आतापर्यंत 48 लाख लोकांना कोरोनाची बाधा, तर तीन लाखांहून अधिक मृत्यू

जीवघेणा कोरोना व्हायरस जगभरात वेगाने फोफावत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 213 देशांमध्ये मागील 24 तासांमध्ये 82,247 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 3617 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 48 लाख कोरोना बाधित लोक आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 16 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 लाख 56 हजार 188 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 71 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त दहा देशांमधून समोर आले आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 34 लाख एवढी आहे.

जगभरातील एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. तर एक तृतियांश मृत्यूही अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये 34636 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 243,695 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या रुस आणि स्पेनपेक्षा कमी आहे. यानंतर ब्राझील, इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इरान, भारत, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button