breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:कोरोना व्हॅक्सीन लवकरच मिळणार-WHO चा दावा

मुंबई : संपूर्ण जगाचं लक्ष हे कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनकडे लागून राहिलं आहे. या दरम्यान जागतिक आरोग्य संस्थेने म्हटलंय की, संशोधकांच्या दाव्यानुसार जगभरात एक वर्षात किंवा त्या अगोदरच कोविड-१९ चं व्हॅक्सीन मिळू शकतं. व्हॅक्सीनला विकसित करण्याचा तसेच त्याची निर्मिती करण्याबाबत WHO ने महत्वाची माहिती दिली आहे.

युरोपिअन संसदेचे एन्वायरमेंट, पब्लिक हेल्थ आणि फूड सेफ्टीसोबत झालेल्या बैठकीत ट्रेडोस घेब्रेयसिस यांनी म्हटलं आहे की,’व्हॅक्सीनची निर्मिती करण आणि या व्हॅक्सीनला जगभर वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. याकरता राजकीय इच्छाशक्ती देखील तितकीच महत्वाची आहे.’

सद्यस्थितीला १०० हून अधिक कोविड-१९ व्हॅक्सीन कँडिडेट डेव्हलप्मेंट उपलब्ध आहेत. संपूर्ण जगभरात प्राथमिक आरोग्य आणि संकटाची परिस्थिती पाहता सगळ्या देशांना यावर काम करावं लागणार आहे. एवढंच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं देखील म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून रविवारी dexamethasone या औषधाच्या उत्पादन प्रक्रियेत झपाट्यानं वाढ करण्यावर भर देण्यात आला. वैद्यकिय चाचण्यांनंतर या औषधाचा वापर गंभीर स्वरुपाच्या coronavirus कोरोना रुग्णासाठी केल्यास त्याचा फायदा होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येत असल्याचं सिद्ध होताच हा निर्णय घेतला गेला.

ऑक्सफर्ड विद्यापीठातून करण्यात आलेल्या संशोधनामध्ये dexamethasone हे औषध काही ठराविक मात्रेमध्ये विविध प्रकारच्या ऍलर्जी, अस्थमा (दमा), काही प्रकारचे कॅन्सर अशा रोगांवर वापरलं जातं. याच औषधावर जवळपास १० दिवस संशोधन केल्यानंतर व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या कोविड रुग्णाला वाचवता येऊ शकतं असं सिद्ध झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button