Corona Virus: दगावलेल्या कर्मचाऱ्यांना हुतात्मा जाहीर करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/corona-vrus.jpg)
बीजिंग | महाईन्यूज
करोना रुग्णांवर उपचारासाठी स्वत:चा विवाह लांबणीवर टाकणाऱ्या २९ वर्षीय चिनी डॉक्टरचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्याला विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांपैकी हा नववा मृत्यू झाहे. वुहान रुग्णालयातील डॉ. पेंग यिनहुआ हे करोनाच्या रुग्णांवर उपचार करीत होते. त्यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पेंग यांना श्वसनमार्गातही संसर्ग झाला होता.
वुहानमधील जियांगशिया जिल्ह्य़ातील फर्स्ट पीपल्स रुग्णालयात ते काम करीत होते. त्यांना संसर्गानंतर २५ जानेवारी रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले नंतर ३० जानेवारीला वुहान जिययिंटन रुग्णालयात हलवण्यात आले पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. पेंग यिनहुआ हे जियांगशिया फर्स्ट रुग्णालयातील आघाडीचे डॉक्टर होते. त्यांनी रुग्णांवर उपचारासाठी स्वत:चा विवाह लांबणीवर टाकला होता. जे डॉक्टर व कर्मचारी उपचार करीत असताना संसर्गाने मरण पावतील, त्यांना चीन सरकार हुतात्मा जाहीर करणार असून संबंधित रुग्णालयांनी अशा मृत्यू झालेल्यांची नावे कळवावीत, असे सांगण्यात आले आहेत. याआधी चिनी डॉक्टर ली वेनलियांग यांचा ७ फेब्रुवारीला विषाणूने मृत्यू झाला होता. त्यांनी या विषाणूबाबत सर्वानाच ३० डिसेंबर रोजी वुई चॅट संदेशातून सावध केले होते.