breaking-newsआंतरराष्टीय

Corona Virus: कोरोनाचे बळी १००० वर; तब्बल ४२ हजार नागरिकांना लागण

बीजिंग | महाईन्यूज

चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १००० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ४२ हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. सोमवारी कोरोनामुळे आणखी १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २४७८ नवी प्रकरणे समोर आलेली आहेत.राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२,६३८ जणांना संसर्ग झालेला आहे.

सोमवारी ज्या १०८ लोकांचा मृत्यू झाला त्यातील १०३ जण हुबेई प्रांतातील होते. या विषाणुंमुळे सर्वाधिक बळी या प्रांतात गेले आहेत. याशिवाय बीजिंग, तिआंजिन, हीलोंगजियांग, अनहुइ आणि हेनानमध्ये यामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एकूण ३९९६ लोकांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. या विषाणुुंचा संसर्ग झालेल्या ७३३३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या विषाणुंचा संसर्ग २१,६७५ लोकांना झाल्याची शक्यता आहे. हाँगकाँगमध्ये सोमवारपर्यंत याचे ४२ रुग्ण समोर आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button