breaking-newsराष्ट्रिय

8 लाख भारतीयांना सोडावे लागणार कुवेत

दिल्ली : कोरोनामुळे आलेला आर्थिक संकट, आणि वाढत चाललेली बेरोजगारीमुळे कुवेत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी कुवेत सरकारने केली आहे. त्यामुळे कुवेतमधील विदेशी कामगारांच्या संख्येत कपात होणार हे नक्की! या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी मिळाली असुन, हा मसुदा पुर्णपणे घटनेला धरुन चालणारा आहे असे विधेयक समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अप्रवासी कोटा विधेयक कुवेतमध्ये मंजुर होण्याची दाट शक्यता आहे.


कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विधेयक मंजुर झाल्यास भारतातील 7 ते 8 लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे. कुवेतमध्ये विदेशी कामगारांमध्ये भारतीयांची संख्य़ा सर्वाधिक आहे. कुवेतची एकुण लोकसंख्या ही 43 लाख आहे, त्यापैकी 30 लाख हे विदेशी प्रवासी आहे. त्यामध्ये भारतीयांची संख्या 14.5 कोटी इतकी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button