breaking-newsआंतरराष्टीय
40 टक्के कमी वेतन घेण्याचा मेक्सिकोच्या नवीन राष्ट्रपतींचा निर्णय
मेक्सिको (मेक्सिको): मेक्सिकोच्या नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी 40 टक्के कमी वेतन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मेक्सिकोचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्रादोर यांनी मेक्सिकोच्या माजी राष्ट्रपतींच्या वेतनापेक्षा 40 टक्के कमी वेतन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नाही, तर राष्ट्रपती म्हणून आपल्या सहा वर्षांच्या कार्यकालात कोणाही सरकारी अधिकाऱ्याला राष्ट्रपतींपेक्षा जास्त वेतन घेता येणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्रेदोर दरमहा फक्त 5707 डॉलर्स वेतन घेणार आहेत.
करदात्यांच्या पैशांतून वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती कमी करण्याच्या आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला आहे. गेल्या रविवारी मेक्सिकोत राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत आंद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्रादोर विजयी झाले. त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जोस मीडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.