breaking-newsआंतरराष्टीय

10 प्रवासी आजारी असल्याने अमेरिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय

न्यूयॉर्क – दुबईहून सलग चौदा तास प्रवास करुन न्यूयॉर्कला पोहोचलेल्या अरब इमिरेट्‌सच्या विमानाला केनेडी विमानतळावर बाजुला करण्यात आले आहे. या विमानातील 10 प्रवासी आजारी असल्याने अमेरिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. येथिल माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमधील जेएफके विमानतळावर उतरवण्यात आलेल्या या विमानात सुमारे 100 आजारी असल्याचे प्रवासी आढळून आले.

यातील 10 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानात 521 प्रवासी होते. क्रू सदस्यांपैकीही काही लोक आजारी पडल्याचे सांगण्यात येते. विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश प्रवाशांनी खोकला आणि ताप आल्याची तक्रार केली होती.

हे विमान सकाळी 9.10 मिनिटांनी उतरवण्यात आले. तिथे आधीपासून विमानतळ प्राधिकरणाचे वैद्यकीय पथक प्रवाशांच्या तपासणीसाठी तयारीत होते. प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यातील अनेक लोकांना रूग्णालयात नेण्यात आले. न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

तत्पूर्वी, अमिरात एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात विमानातील 10 लोकांची प्रकृती बिघडली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. एकाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान मक्का येथे थांबवण्यात आले होते. तिथे सध्या फ्ल्‌यूची साथ सुरू आहे. तेच प्रवाशांची प्रकृती बिघडण्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येते.

एका प्रवाशाने सोशल मीडियावर रनवेवर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाचे छायाचित्र शेअर केले आहे. तर दुसऱ्या एका प्रवाशाने आपल्या बाजूला अनेक आजारी प्रवासी पाहिल्याचे सांगितले. जे प्रवासी ठीक आहेत, ते आपला प्रवास कायम ठेऊ शकतात, असे विमान कंपनीने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button