४५ वर्षानंतर ‘स्पेस एक्स’ला सुखरूप समुद्रात उतरविण्यात यश आले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/spacex-splashdown.jpg)
वॉशिंग्टन – तब्बल 45 वर्षानंतर ‘स्पेस एक्स’ कॅप्सूलला मेक्सिकोच्या खाडीमध्ये व्यवस्थितपणे उतरविण्यात यश आले आहे. फ्लोरिडामध्ये भीषण वादळाची भीती असतानाही ‘स्पेक्स एक्स’ क्रु ड्रॅगनला भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री उशिरा मेक्सिकोच्या खाडीत उतरविण्यात यश लाभले आहे. या अवकाशयानात 63 दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोन अंतराळवीरांनाही या ‘स्पेस एक्स’ कॅप्सूलच्या आकाराच्या अवकाशयानासह समुद्रात उतरविण्यात आले.
अमेरिकेची अंतराळ कंपनी असलेल्या ‘स्पेस एक्स’ यांचे क्रु ड्रॅगन कॅप्सूल भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मेक्सिकोच्या खाडीमध्ये अलगद उतरले. यामध्ये बसलेले अंतराळवीर रोबर्ट बेनकेन आणि डग्लस हर्ले हे पॅराशुटच्या साहाय्याने समुद्रात सुखरूप उतरले. तर कॅप्सूल यानही सुखरूप समुद्रात उतरले. 45 वर्षानंतर अमेरिकेचे अंतराळ अवकाशयान समुद्रावर सुखरूप उतरले आहे. याला अंतराळ वैज्ञानिकांच्या भाषेमध्ये ‘Splesh लँडिंग’ असे म्हटले जाते. यापूर्वी 24 जुलै 1975 रोजी अपोलो सोयुज अवकाशयान अशाप्रकारे समुद्रात उतरविण्यात आले होते. हे अवकाशयान अमेरिका आणि रशियाने एकत्रितपणे अवकाशात पाठविले होते व समुद्रात उतरविले होते.
स्पेस एक्स या कॅप्सूल यानामध्ये दाखल झालेले व सुखरूप समुद्रात उतरलेले डग्लस हर्ले यांनी रेडिओवर बोलताना अत्यानंद जाहीर केला. ते म्हणाले, ‘आमचा आनंद गगनात मावत नव्हता. हा खरा म्हणजे आमच्यासाठी सन्मानाचा दिवस आणि क्षण आहे. वास्तविक आमचा रेडिओ संपर्क काही काळ तुटला होता. रॉबर्ट बेनकेन आणि डग्लस हर्ले हे 63 दिवस अंतराळात होते. या दोन्ही अंतराळवीरांनी आपल्या समवेत अंतराळात नेलेला अमेरिकेचा झेंडाही परत आणला आहे. हा झेंडा 9 वर्षांपूर्वी अवकाशात पाठविण्यात आलेला होता.