breaking-newsराष्ट्रिय

१२ व्या मजल्यावर दोन टॉवरच्या गॅपमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

आम्रपाली सिलिकॉन सिटीमध्ये मंगळवारी दोन टॉवरच्या गॅपमध्ये १२ व्या मजल्यावर एका महिलेचा मृतदेह सापडला. नोएडाच्या सेक्टर ७६ मध्ये हे टॉवर आहेत. हा मृतदेह खाली आणण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करावे लागले. बऱ्याच तासाच्या प्रयत्नानंतर दोन टॉवरच्यामध्ये अडकलेला हा मृतदेह त्यांनी खाली आणला.

मृतदेह खराब अवस्थेत होता. मृत महिला सोसायटीमधील एका टॉवरमध्ये घरकाम करायची. १२ व्या मजल्यावर टॉवर सी आणि बी च्या मध्ये हा मृतदेह अकडला होता. टॉवर सी मध्ये १६ तर बी मध्ये १८ मजले आहेत. दोन टॉवरमध्ये फक्त एक फुटाचे अंतर आहे. रहिवाशांनी सकाळी ७.३० च्या सुमारास टॉवरमधील मोकळया जागेतून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले अशी माहिती सोसायटीचा सुरक्षारक्षक दीपक मिश्रा यांनी दिली.

दोन टॉवरमधल्या स्लॅबवर मृतदेह पडलेला होता असे सोसायटीचे सुरक्षा प्रमुख विजय सिंह यांनी सांगितले. त्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले पण त्यांना मृतदेह खाली आणता आला नाही. त्यानंतर एनडीआरएफच्या टीमने पाचारण केले. पण त्यांना सुद्धा मृतदेह खाली उतरवण्यासाठी बरेच तास लागले. टॉवर डी मधील १२ मजल्यावरचा काही भाग तोडून दोरीच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतरवला. मृत महिला २८ जूनपासून बेपत्ता होती. मालकाने तिच्या बिहारमधील कुटुंबाला याबद्दल माहिती दिली होती. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button