breaking-newsराष्ट्रिय

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण: माझ्या मुलीला जसं त्यांनी जाळलं, तसंच त्या नराधमांनाही जाळा; पीडितेच्या आईचा आक्रोश

| महाईन्यूज | हैदराबाद |

माझ्या मुलीला जसं त्यांनी जाळून मारलं, तसंच त्या नराधमांनाही जाळा अशी मागणी हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील मृत मुलीच्या आईने केली आहे. सध्या देशभरात वेगवेळया ठिकाणी या घटनेवर संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत आहे “माझ्या मुलीला जसं त्यांनी जाळून मारलं तसंच त्यांना सुद्धा जाळून मारा” असं मृत मुलीच्या आईने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

मृत मुलीच्या आईने अखेरच्या क्षणी मुलीबरोबर काय बोलणे झाले त्या आठवणी सांगितल्या. “घरच्या वाटेवर असताना तिला खूप भूक लागली होती. त्यामुळे तिने मला फळे कापून ठेवायला सांगितली होती. दुचाकीचा टायर पंक्चर झाले आहे किंवा काय? याबद्दल तिने मला काहीही सांगितले नाही. मी जेवण बनवून घरी तिची वाट पाहत होते” असे पीडित मुलीच्या आईने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button