हैदराबाद बलात्कार प्रकरण: एन्काऊंटरचा तपास झाला पाहिजे – ओवैसी
महाईन्यूज | दिल्ली
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांनी बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. याघटनेला एमआयएमचे पक्षाचे प्रमुख अससुद्दीन ओवैसी यांनी विरोध करत पोलिसांच्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे.
यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी ही चकमक चुकीची असून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती. त्यानंतर आता ओवैसी यांनी याप्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या चकमकीचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. हे लोकं जनावरासारखे झाले आहेत. यावर तात्पुरता उपाय करायला नको. महिलांच्या सुरक्षेसाठी अनुकुल वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं यापूर्वी मुख्यमंत्री म्हणाले असल्याचं औवेसी यांनी सांगितलं.