हेरगिरीप्रकरणी उत्तर प्रदेशमधून लष्करी जवानाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Arrest-1-3.jpg)
उत्तर प्रदेशमधील मीरत कँटोन्मेंट परिसरातून लष्कराच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या या जवानाची चौकशी केली जात आहे. अद्याप त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, गोपनीय माहिती फोडल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
त्याच्या या कृत्यात लष्करातील आणखी काही लोकांचा सहभाग आहे की नाही हे तपासून पाहिले जात आहे. यापूर्वी नागपूर येथील ब्राह्मोस यूनिटमधून एअरोस्पेसचा अभियंता निशांत अग्रवालाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या एटीएसने संयुक्तरित्या ही कारवाई केली होती. चौकशीसाठी त्याला लखनऊला नेण्यात आले होते. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता, असा त्याच्यावर आरोप आहे. तो फेसबुकवर नेहा शर्मा आणि पूजा रंजन नावाच्या मुलींबरोबर चॅट करत असत.