Breaking-newsराष्ट्रिय
हिमाचल प्रदेशात इमारत कोसळून १३ ठार, मृतांमध्ये १२ जवानांचा समावेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Solan-1.jpg)
हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी इमारत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी रविवारी इमारत कोसळली. त्यानंतर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जणांची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लष्कराचीही मदत घेण्यात येते आहे. मृतांमध्ये १२ लष्करी जवानांचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे.
सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनीही काही वेळापूर्वीच घटनास्थळी भेट दिली. आत्तापर्यंत १७ जवानांची सुटका करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या दुर्घटनेत १२ जवान आणि १ नागरिकाचा मृत्यू झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. इतर जवान अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे.