breaking-newsआंतरराष्टीय

हँगओव्हरमुळे घेऊ शकता सुट्टी; न्यायालयाचा निर्णय

एखाद्या दिवशी आदल्या रात्री झालेल्या पार्टीमध्ये अधिक दारु प्यायल्याने हँगओव्हर न उतरल्याचे कारण देत तुम्ही कधी तुमच्या बॉसकडे सुट्टी मागितली आहे का? अर्थात अशी सुट्टी मागण्यासाठी हिंमत लागते आणि सर्वांमध्येच असते असं नाही. त्यामुळेच अनेकदा हँगओव्हरमुळे डोकं दुखत असतानाही अनेकजण ऑफिसला जातात. मात्र तुम्ही जर्मनीत असाल तर तुम्हाला हँगओव्हर झाल्यास सुट्टी मिळू शकते. आहो नाही ही खोटी बातमी किंवा मस्करी नसून खरोखरच जर्मनीमधील एका न्यायालयाने हँगओव्हर हे ‘आजारपण’ असल्याचा निर्णय दिला आहे.

द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीमधील न्यायालयाने दारुची नशा न उतरणे म्हणजे हँगओव्हर दुसऱ्या दिवशीही सकाळी कायम असणे हे आजारपण असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच हँगओव्हर उतरलेला नसताना एखाद्या व्यक्तीला ऑफिसला बोलावणे बेकायदेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button