breaking-newsराष्ट्रिय

स्वामींची याचिका त्वरेने विचारात घेण्यास नकार

नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिरात पुजा करण्याचा अधिकार हा माझा मुलभूत अधिकार असून आपल्याला हा अधिकार बजावण्यास अनुमती द्यावी अशी मागणी करणारी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर त्वरीत सुनावणी घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या या याचिकेवर तातडीने विचार करण्यास आज स्पष्ट नकार दिला.

सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिक विचारार्थ आली होती. तथापी त्यावेळी न्यायालयाने स्वामींना तुम्ही हा विषय नंतर उपस्थित करू शकता असे नमूद करीत त्यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. त्यावर प्रतिक्रीया देताना स्वामी यांनी म्हटले आहे की नंतर दाखल करू शकता हा शब्दप्रयोग सब्जेक्‍टीव्ह आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनी मी पुन्हा याच मागणीची याचिका सादर करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button