breaking-newsटेक -तंत्र

स्वस्त आयफोननंतर अॅपल आणणार स्वस्त स्मार्टवॉच

नवी दिल्लीः जगात स्मार्टवॉच मार्केटमध्ये अॅपल वॉचचा दबदबा आहे. सध्या बाजारात कंपनीचे दोन मॉडलची Apple Watch Series 5 आणि Apple Watch Series 3 विक्री केली जात आहे. यावर्षी कंपनीने अॅपल वॉच सीरीज ६ स्मार्टवॉच लाँच करू शकते. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे. अॅपल स्वस्त स्मार्टफोन iPhone SE प्रमाणे स्वस्त स्मार्टवॉच Apple Watch SE लाँच करणार आहे. सध्या यावर काम सुरू आहे.

अॅपल Watch SE कशासाठी आणणार
कंपनी या स्मार्टवॉचला या ग्राहकांसाठी आणू शकते. जे जास्त किंमत असल्याने कंपनीची वॉच खरेदी करू शकत नाही. काही स्ट्रॅटेजी अंतर्गत कंपनी iPhone SE आणू शकते. अॅपल वॉच सीरीज ३ ला रिप्लेस करू शकते. यात वॉच सीरीज ३ सारखे डिझाईन मिळू शकते. तसेच काही फीचर्स लेटेस्ट अॅपल वॉच सीरीज ६ साठी आणू शकते.

काय असतील फीचर्स
यात लेटेस्ट डिझाईन पाहायला मिळू शकणार नाही. परंतु, यातील फीचर्स जबरदस्त असतील. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अॅपल वॉच एसई स्मार्टवॉचचा 42mm व्हेरियंट आणले जाणार आहे. याची डिझाईन सीरीज ३ मधून घेतली जाणार आहे. यात एस६ प्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. जो वॉच सीरीज ६ सोबत आणले जाईल. यात १६ जीबी स्टोरेज, ब्लूटूथ ५.० आणि जबरदस्त कनेक्टिविटी साठी W4 वायरलेस पेयरिंग चिप दिली जाणार आहे.

काय असेल किंमत
ही किंमत सुद्धा अॅपल वॉच सीरीज ३ इतकी असू शकते. भारतात सीरीज ३ स्मार्टवॉचची किंमत २० हजार ९०० रुपये आहे. याच्या 42mm व्हेरियंटची किंमत २३ हजार ९०० रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button