breaking-newsआंतरराष्टीय

सौदी सरकारच्या कडक धोरणाने भारतीय परतीच्या मार्गावर…

रियाध (सौदी अरब): सौदी सरकारच्या कडक धोरणाने सौदीतील भारतीयांना परतीचा मार्ग धरावा लागत आहे. अमेरिकेच्या धर्तीवर सौदी अरबनेही सौदी फर्स्ट धोरण स्वीकारले आहे आणि परदेशी नागरिकांसाठी नियम अधिकाधिक कडक केले आहेत. परिणामी त्यांना सौदीत राहणे कठीण होऊन मायदेशाचा मार्ग धरावा लागत आहे. सौदीत फॅमिली टॅक्‍स दुप्पट करण्यात आला असून सन 2020 पर्यंत तो चौपट होणार आहे. शिवाय वीज, पांणी आणि इंधनाच्या दरातही मोठी वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टींमुळे परदेशी नागरिकांना सौदी सोडून मायदेशी परतण्याची वेळ आली आहे. सौदीत 2017 मध्ये फॅमिली टॅक्‍स चालू करण्यात आला, तेव्हा तो दर माणशी दर महिना 100 रियाल म्हणजे 1828 रुपये होता. 2018 मध्ये तो दुप्पट म्हणजे 3656 रुपये करण्यात आला. परिणामी कुटुंबातील जादा सदस्यांना परत पाठवणे अनिवार्य झाले आहे.
डिसेंबर महिन्यात इंधनचा दर 75 हलाला म्हणजे .01 रियाल होता तो आता 1.38 रियाल म्हणजे 25 रुपये झाला आहे. विजेचे दर तीनपट करण्यात आले आहेत. मोफत असणाऱ्या फॅमिली व्हिसासाठी आता 36,000 रुपये मोजावे लागतात. सिंगल रिएंट्री व्हिसा एका वर्षासाठी 3600 रुपये दर होता तो दोन महिन्यांसाठी 3600 केला असून पुढे दरमहा 1800 रुपये झाला आहे. सौदी अरबमध्ये सुमारे 32.5 लाख भारतीय असून त्यात सर्वाधिक केरळचे आहेत. त्या खालोखाल तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानचे लोक आहेत. आतापर्यंत किती भारतीय सौदीहून परत आले आहेत याची निश्‍चित संख्या उपलब्ध झालेली नाही.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button