Breaking-news
सोलापूरात 24 तासात आढळले 233 नवे कोरोनाबाधित रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Corona-test-hero-a219365.jpg)
सोलापूर : सोलापूरात कोरोनाचा कहर हा सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रूग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. सोलापूर शहरात गेल्या 24 तासात 233 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या ही 7 हजार 67 वर पोहोचली आहे. तर 3727 जणांनी कोरोनावर मात करून सुखरुप घरी सुद्धा परतले आहे. सध्या जिल्ह्यात 2929 रूग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान 411 जणांचा मृत्यू झाला आहे.