सेशेल्समध्ये भारतीय नौदलाचा तळ बनणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/seyshells.jpg)
नवी दिल्ली – सेशेल्समध्ये भारतीय नौदलाचा तळ बनणार आहे. सेशेल्सच्या ऍझम्प्शन बेटावर भारतीय नौदलाचा तळ उभारण्यासाठी सेशेल्सने मान्यता दिली आहे. ऍझम्प्शन बेटावर भारतीय नौदलाचा तळ उभारण्यासाठी सेशेल्सने दिलेली मान्यता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतीची मोठीच सफलता मानली जात आहे.
ऍझम्प्शन बेटावर सेशेल्सने भारतीय नौदलाला तळ उभारण्यासाठी पूर्वी मान्यता दिली होती, मात्र नंतर विरोधी पक्षांच्या दबावाने ती तडकाफडकी रद्द करण्यात आली. आता पुन्हा नौदल तळासाठी मान्यता मिळसलेली आहे. सोमवारी भारत आणि सेशेल्स यांच्यात सहा करार करण्यात आले.
चीन हिंदी महासागरात आपले सामर्थ्य वाढवत आहे. त्याला शह देण्यासाठी ऍझम्प्शन बेटावर भारतीय नौदलाचा तळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
ऍझम्प्शन बेटावऱ नौदल तळ उभारण्याबाबत भारताशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असे सेशेल्सचे राष्टृपती डॅनी फॉरे यांनी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी सेशेल्समध्ये एका पत्रकार परीक्षेत निवेदन केले होते. त्या पार्श्वभूमीवर तळ उभारण्यास मिळालेली मान्यता ही एक मोठीच सफलता मानावी लागणार आहे.