breaking-newsराष्ट्रिय

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशी थरूर यांच्याविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली – कॉंग़्रेस नेते शशी थरूर यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी पत्नी सुनंदा पुष्करला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोप ठेवले आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यासाठी थरूर यांची चौकशी आवश्‍यक असल्याने थरूर त्यांना कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणीही पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुमारे 3 हजार पानांचे आरोपपत्र आज न्यायालयामध्ये सादर केले. त्यामध्ये आरोपी म्हणून शशी थरूर यांचे एकट्याचेच नाव आहे. थरूर यांच्याविओर्धात पुरेसे पुराअवे असल्याचेही या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. थरूर यांनी आपल्या पत्नीला अत्यंत क्रूरतेने वागवले असल्याचेही य पोलिसांनी म्हटले आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूसंदर्भात महानगर दंडाधिकारी धर्मेंद्र सिंह यांच्यासमोर आज आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रावर 24 मे रोजी सुनावणी होणार आहे. यासंदर्भात तिरुवनंतपुरम येथील खासदार असलेल्या थरूर यांना समन्स पाठवण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये थरूर आणि पुष्कर यांच्या घरातील नोकर नारायण सिंह हा प्रमुख साक्षीदार आहे. थरूर यांच्यावर पत्नीचा छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. थरूर आणि सुनंदा यांच्या विवाहानंतर 3 वर्षे, 3 महिने आणि 15 दिवसांनी पुष्कर यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचा विवाह 22 ऑगस्ट 2010 रोजी झाला होता.

सुनंदा पुष्कर या 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतल्या लक्‍झरी हॉटेलच्या रुममध्ये मृतवस्थेत आढळल्या होत्या. या प्रकरणी थरूर हे आवश्‍यकता भासेल तेंव्हा चौकशीस उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांना अद्याप या प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक नियुक्‍त करण्याची मागणी करणारी सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी फेटाळली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button