breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

सिद्धूंची पाक भेट यशस्वी? ३८०० भारतीयांना मिळाला व्हिसा

लाहोरजवळच्या नानकाना साहीबला भेट देण्यासाठी पाकिस्तानने ३,८०० पेक्षा जास्त भारतीयांना व्हिसा दिला आहे. हे पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीला यश आल्याचे बोलले जात आहे. सिद्धू यांनी यांनी १८ ऑगस्ट २०१८ रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला हजर लावली होती. त्यावेळी लष्टर प्रमुखांच्या गळाभेटीनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांच्या गळाभेटीबद्दल स्पष्टीकरण देताना सिद्धू म्हणाले होते की, ‘जनरल बाजवा यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे. यानंतर ते म्हणाले की, आम्ही गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर करतारपुर प्रवास सुरू करण्याच्या विचारात आहोत.’ त्यांच्या या पाकिस्तान भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धू आणि पर्यायाने काँग्रेस यांना धारेवर धरले होते.

२१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या गुरू नानक यांच्या ५४९ व्या जयंती कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लाहोरजवळच्या नानकाना साहीबला भेट देण्यासाठी पाकिस्तानने ३,८०० पेक्षा जास्त भारतीयांना व्हिसा दिला आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात गेल्या काही वर्षांत शिख भाविकांना एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच व्हिसा दिल्याचे म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button