breaking-newsपश्चिम महाराष्ट्र
सांगली बाजार समितीवर अखेर प्रशासक नियुक्ती
सांगली – सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंध (सहकार) नीळकंठ करे यांनी बाजार समितीचा कारभार हातात घेतला आहे. बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. मात्र त्यांचे प्रयत्न अखेर तोकडे पडल्याचे दिसून आले आहे.
प्रशासक नियुक्तीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत बुधवार २६ ऑगस्ट रोजी संपताच लगेच काल दुसऱ्या दिवशी ही प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. या बाजार समितीत काँग्रेसची सत्ता होती. सत्तेची सर्व सूत्रे डॉ.पतंगराव कदम गटाकडे होती. मात्र आता या बाजार समितीत लवकरच अशासकीय प्रशासक मंडळाची स्थापना होणार आहे.