breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत आज 289 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

सांगली – सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज पुन्हा जिल्ह्यात 289 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 8 हजार 305 एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात तब्बल 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून, आतापर्यंत 309 जणांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरू असुन, 4 हजार 768 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सांगली कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आत सांगलीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button