Breaking-newsराष्ट्रिय
सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ
![Financial ruin to the common man; Diesel and petrol became more expensive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/petrol-pump.jpg)
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे पेट्रोलच्या दरात वाढ होत असली तरी डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
गेल्या रविवारपासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोलचे दर लिटरमागे 17 पैशांनी वाढवले आहेत. काल दिल्लीत पेट्रोलचे दर 16 पैशांनी, कोलकाता येथे 13 पैशांनी, मुंबईत 14 तर चेन्नईत 12 पैशांनी वाढले होते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पेट्रोलचे दर 80.90 रुपयांवर गेले आहेत. याच शहरातील डिझेलचे दर 73.56 रुपयांवर गेले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर लिटरमागे 87.58 रुपयांवर गेला आहे. तर डिझेलचे दर 80.11 रुपयांवर गेले आहेत