breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना कोरोनाची लागण

सातारा – सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती संजीवराजे यांनी स्वत: दिली.

मला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने मी स्वत:हून कोव्हिड-१९ची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. माझी प्रकृती उत्तम आहे, परंतु गेल्या पंधरा दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या फलटण शहर आणि तालुक्यातील सर्वांनी स्वत:ला सात दिवस होम क्वारंटाईन करावे आणि आठव्या दिवशी कोव्हिड-१९ची चाचणी करून घ्यावी. आपण होम क्वारंटाईन झाल्याचे फलटण शहरातील नागरिकांनी नगरपालिकेत आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयात कळवावे, असे आवाहन संजीवराजे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button