Breaking-newsराष्ट्रिय

शत्रूवर हल्ला करण्यासाठी ‘तेजस’ होणार अधिक शक्तीशाली, बनवणार Mk-2 व्हर्जन

महाईन्यूज| दिल्ली

तेजस (एमके-२) या फायटर विमानाच्या व्यावसायिक उत्पादनाला पुढच्यावर्षी फेब्रुवारी २०२० पासून सुरुवात होणार आहे. एॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश एस देवधरे यांनी ही माहिती दिली. तेजसचे एमके २ व्हर्जन शक्तीशाली रडारसह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज असणार आहे.

या फायटर जेटच्या एव्हिऑनिक्स सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली असून ते दृष्टीपलीकडच्या लक्ष्यावर प्रहार करण्यास सक्षम असेल. Mk-1 आणि Mk-1A पेक्षा तेजस Mk-2 ची इंधन टाकी मोठी असून त्यावरुन जास्त शस्त्रास्त्रे वाहून नेता येतील. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button