वैष्णोदेवीच्या भक्तांना आता स्पीड पोस्टने मिळणार प्रसाद
श्रीनगर – जम्मूच्या कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी देवस्थान बोर्डाने पोस्ट विभागासोबत एक करार केला आहे, या अंतर्गत आता भक्तांना स्पीड पोस्टच्या माध्यमातूनसुद्धा प्रसाद मिळणार आहे. तसेच पोस्ट विभाग स्पीड पोस्टमाध्यमातून प्रसाद भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार झाले आहे.
एसएमव्हीडीच्या वक्तव्यानुसार, देवस्थान बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार आणि जम्मू-काश्मीरमध्ये पोस्ट सेवेचे संचालक गौरव श्रीवास्तव यांनी कटरामध्ये आध्यात्मिक विकास केंद्रात शनिवारी करारावर हस्ताक्षर केले. यामध्ये म्हटले आहे की, भक्तांच्या सुविधेसाठी, सध्याच्या स्थितीत बोर्डाने आज त्यांच्या ठिकाणापर्यंत प्रसाद पोहोचविण्याची सुविधा सुरू केली. बोर्डाच्या या उपक्रमामुळे ते भक्तसुद्धा माता वैष्णोदेवीचा प्रसाद घेऊ शकतील, जे सध्याच्या स्थितीमुळे प्रवास करू शकत नाहीत.
देवस्थान बोर्डाने प्रसादाच्या तीन श्रेणी ‘ना- नफा, ना-तोटा’च्या आधारावर लाँच केल्या आहेत. देवस्थान बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा टेलीफोन मोडद्वारे बुकिंग करता येणार आहे. कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मार्चपासूनच श्री वैष्णोदेवीची यात्रा बंद केली होती, ती आता १६ ऑगस्टपासून पुन्हा काही अटींनुसार सुरू केली आहे. यामध्ये मर्यादित संख्येत भक्तांना यात्रेची परवानगी आहे.